आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

आई-बापाने शिक्षणासाठी शेत विकलं, पोराने कलेक्टर होऊन पांग फेडले !

सोलापूर जिल्ह्यातील बावची या खेडे गावातील श्रीकांत खांडेकर बनला कलेक्टर

सोलापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2019 चे निकाल जाहीर केले आहेत. प्रदीप सिंह देशात अव्वल आला, तर जतीन किशोर देशात दुसरा आहे. प्रतिभा वर्मा देशात तिसरी, तर महिला उमेदवारांमध्ये प्रथम आली आहे.यूपीएससीने सप्टेंबर 2019 मध्ये घेतलेल्या लेखी आणि फेब्रुवारी ते ऑगस्ट 2020 मध्ये घेतलेल्या मुलाखती किंवा व्यक्तिमत्त्व चाचणीच्या निकालाच्या आधारे निकाल जाहीर केला. उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम यादी वेबसाईटवर घोषित केली आहे.

             विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण 829 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. 2019 मध्ये प्रथमच सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत राबवल्या गेलेल्या ‘ईडब्ल्यूएस कोटा’ (आर्थिकदृष्ट्या मागास) अंतर्गत 78 उमेदवारांची निवड झाली आहे. तर 11 उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत श्रीकांत खांडेकर यांनी २३१ क्रमांकाची रँक मिळवली आहे. श्रीकांत खांडेकर हे कलेक्टर झाले त्यावेळे त्यांची आई शेतात खुरपण करत होत्या. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशात 231व्या क्रमांकावर आलेल्या श्रीकांत खांडेकरच्या उच्च शिक्षणासाठी निरक्षर असलेल्या कष्ट करत वडीलांनी तीन एकर जमीन मुलाच्या शिक्षणासाठी विकली आणि प्रसंगी व्याजाने पैसे काढून तिन्ही मुलाचे शिक्षणावर खर्च केले. वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत अखेर मुलाने कलेक्टर होण्याचे ध्येय पूर्ण केले.

              दुष्काळी तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या बावची गावात जिरायत शेतीत केलेला खर्च परवडत नसल्याने मोलमजुरी करून जगणाऱ्या बावची गावातील कुंडलिक खांडेकर यांनी स्वत: अशिक्षित असूनही आपल्या तीन मुलांना शिक्षित केले. थोरल्या मुलाने मार्केटिंगच्या माध्यमातून रोजगार मिळवला आणि दुसरा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. तिसऱ्या मुलाचे पदवीचे शिक्षण सुरू आहे. बावचीच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झाल्यानंतर श्रीकांतने निंबोणी इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयातून बारावी विज्ञान शिक्षण झाल्यानंतर दापोलीच्या कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना आयआयटीत झालेली निवड सोडून त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची पुणे येथे एक वर्ष तयारी केली. त्यानंतर दिल्लीत सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात वनसेवा परीक्षेत देशात 33 वा क्रमांक व महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला. दहावीपर्यंत मराठी माध्यमानंतर अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. सुरवातीला इंग्रजी विषयाशी संघर्ष करावा लागला; पण परिस्थितीची आईवडिलांनी जाणीव करून दिली नसल्याने लोकसेवा आयोगात चांगले करिअर करता आले.

             या यशाबद्दल बोलताना श्रीकांत म्हणाला, शहरी भागातील मुलांच्या परिस्थितीशी तुलना न करता आपले ध्येय समोर ठेवून तयारी केल्यास यश मिळू शकते. आज लोकसेवा परीक्षेचा निकाल जाहीर होताच बावची गावावर आनंदाचे वातावरण पसरले असून, वडील आजारी असल्यामुळे एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी गेले. स्वतःजवळ मोबाईल नसल्यामुळे दवाखान्यात फोन करून मुलगा कलेक्टर झाल्याचे नातेवाइकांनी कळवले. तर आई शेतातच कष्ट करत असल्याची आढळून आली.

मुलाच्या यशाबद्दल आई कमल खांडेकर म्हणाली, मुलाच्या यशाने आमचे कुटुंब सुखी झाले. अजूनही कष्ट करत असून, शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज आजही भरतोय. कष्ट करतोय. कुणाशी लबाडी केली नसल्याने मुलाने सार्थकी लावले. परीक्षेतील यशाप्रमाणे प्रशासनातील कामात देखील त्याने आपला ठसा उमटवावा. गोरगरिबांची सेवा करावी, एवढीच अपेक्षा आहे.

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो. तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, अध्यात्मिक, शेती व उद्योग, व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील. आपले लेख, साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946 8605376793

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close