ब्रेकिंग

गोखळी पाटी ता.फलटण येथे दुध दरवाढीसाठी भाजपाचे आंदोलन

गोखळी (प्रतिनिधी ) – महाविकास आघाडीच्या सरकारने दुधाला दरवाढ द्यावी या मागणीसाठी फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी पाटी येथे भारतीय जनता पक्षाचे वतीने खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अध्यक्ष विक्रम पावसकर यांचे मार्गदर्शनाखाली फलटण -कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख पै.बजरंग गावडे, तालुका उपाध्यक्ष पिंटू जगताप यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले .

            “कोरोना संसर्गजन्य विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी फलटण पूर्व भागातील दुध उत्पादक उपस्थित होते. यावेळी दिलेल्या निवेदनात मध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या त्या पुढील प्रमाणे दुध उत्पादक शेतकर्यांना दुधावर अनुदान मिळाले पाहिजे, दुध दरवाढ मिळाली पाहिजे, दुध पावडरला पन्नास रूपये अनुदान मिळाले पाहिजे, दुधाचे अनुदान थेट शेतकरी खात्यात जमा झाले पाहिजे,”‘ बिसलेरी पाण्याची बाटली वीस रूपये तर दुधाची बाटली पंधरा रुपये” शेतकरी वर्गाची चेष्टा चाललीय “दुध उत्पादक उपाशी ठाकरे सरकार तुपाशी” असा आरोप यावेळी पै.बजरंग गावडे यांनी बोलताना केला.               

        आंदोलकांच्या वतीने फलटण विधानसभा मतदार संघ संपर्क प्रमुख पै बजरंग गावडे यांनी पोलीस निरक्षक नितीन सावंत साहेब यांना निवेदन सादर केले. सदर निवेदन शासनाकडे पाठविण्यात येईल असे पोलीस निरक्षक सावंत साहेब यांनी सांगितले या आंदोलनामध्ये बाबा वरे, बाळासाहेब गावडे, राजेन्द्र भागवत, अनिल धुमाळ,स्वप्निल खटके, सतीश गावडे, सुखदेव खटके , रोहन गावडे, बबलू गावडे, दादासो घाडगे,आकाश धुमाळ, सचिन माने,चेतन गावडे, दादा कदम,भारत गावडे आदीं सहभागी झाले होते.

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो.तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय,क्रीडा,आरोग्य,अध्यात्मिक,शेती व उद्योग,व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील.आपले लेख,साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close