ब्रेकिंग

सोने झळाळले, चांदीचाही भाव वधारला

कोरोनाचे संकट असले तरी लॉकडाऊनच्या काळात लोकांचा सोने खरेदीवर भर दिसून येत आहे. सोने दरात सातत्याने वाढ होत आहे.

मुंबई : कोरोनाचे संकट असल्याने अनेक बाबतीत मंदीचे सावट दिसत आहे. म्हणावे तसे उद्योग-धंदे सुरु झालेले नाहीत. लॉकडाऊन सुरुच आहे. रेल्वे, मेट्रो, एसटी सेवा बंद अवस्थेत आहे. विशेष रेल्व सेवा आणि जिल्हापुरती एसटी सेवा सुरु आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला अद्याप गती मिळालेली नाही. असे असताना लॉकडाऊनच्या काळात लोकांचा सोने खरेदीवर भर दिसून येत आहे. सोने दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात सोने दर हा ५३ हजारांवर पोहोचला आहे. त्यात त्यात वाढ होवून तो ५४ हजारांच्यापुढे जात ५५ हजरांकडे वाटचाल करता दिसत आहे. त्यामुळे मंदीत सोने मागणी वाढताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर सतत वधारताना दिसत आहेत. सोने दराने तर सध्या उच्चांकच गाठल्याचे ठरविल्याचे दिसून येत आहे. सराफा बाजारात शुक्रवारी सोने किंमतीत ६८७ रुपयांची वाढ होऊन सोन्याचा दर ५४ हजार ५३८ रूपये प्रति १० ग्राम वर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने-चांदीच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यानंतर दिल्लीतील २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ६८७ रूपयांची वाढ झाल्याचे सराफा व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. यापुढेही अशीच वाढ सुरु राहिली तर गणपतीपर्यंत सोने ६० हजार रुपयांच्या घरात पोहोचेल, असा दावाही सराफा बाजाराकडून करण्यात येत आहे.
                   गुरुवारी सोने दर ५३ हजार ८५१ रूपये प्रति १० ग्रामवर पोहोचला होता. तर दुसरीकडे शुक्रवारी चांदीच्या किंमतीतही मोठी वाढ पाहायला मिळाली. चांदीच्या किंमतीत २ हजार ८५४ रुपयांची वाढ होऊन ती ६५ हजार ९१० रुपये प्रति किलोवर पोहोचली. गुरुवारी चांदीचा दर ६३ हजार ०५६ रुपये प्रति किलो इतका होता. गेल्या अनेक दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात वाढ होत आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकातही घसरण पाहायला मिळाली. तर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयची चार पैशांनी घसरण होऊन एका डॉलरची किंमत ७४.८४ रुपयांवर बंद झाली.

                     आंतरराष्ट्रीयजारपेठेत सोने दरवाढीसह १ हजार ९७६ डॉलर्स प्रति औंस आणि चांदीचा गर २४ डॉलर्स प्रति औंसवर पोहोचलाय. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तर आर्थिक वृद्धी दरही कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सोने दरात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो.तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय,क्रीडा,आरोग्य,अध्यात्मिक,शेती व उद्योग,व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील.आपले लेख,साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close