ब्रेकिंग

महाविकास आघाडीने शेतकरी यांच्या भावना लक्षात घेवून दूधाला दरवाढ द्यावी- माजी मंत्री महादेव जानकर

पुणे प्रतिनिधी- मी स्वतः पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री असताना माझ्या काळात दुधाला ७ रुपये दरवाढ केली होती. एवढी मोठी दरवाढ करणारा देशातील पहिला दुग्धविकास मंत्री मी होतो. स्वतःची एक ही डेअरी नाही. तरीही हा प्रश्न जिव्हाळ्याने सोडविला होता कारण माझा जन्मच शेतकरी कुटुंबामध्ये झाला आहे. महाविकास आघाडीला शेतकऱ्यांच्या भावना लक्षात यायला तयार नाहीत. आघाडी सरकारने ताबडतोब दुधाला प्रति लिटर दरवाढ द्यावी असे माजी दुग्धविकास पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटले आहे.

                आज जानकर यांनी दुधाच्या दरवाढीसाठी पंढरपुरात आंदोलन केले त्यांनी चंद्रभागेत विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून आंदोलन केले.त्यावेळी त्यांनी चंद्रभागेत विठ्ठलाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन केले गेल्या महिन्यातील राष्ट्रीय समाज पक्षाने १९१ तालुक्यात दुधाच्या दरवाढीसाठी घातला होता त्यामुळे आषाढीची वारी करता आली नाही म्हणून मीही दुधाची वारी करायला आलोय विठ्ठलाच्या दारात आलो नक्की ची लढाई यशस्वी होईल असे जानकर म्हणाले.

      अमुलच्या धर्तीवर महाराष्ट्रात दुधाचा एकच ब्रँड तयार करा       

             खासगी दूध संघ शेतकऱ्याच्या गाईच्या दुधाला २० रुपये देऊन तेच दूध ग्राहकांना ४५ ते ६० रुपयांपर्यंत देऊन दुपटीपेक्षा जास्त नफा कमवित आहेत. तेव्हा गुजरातच्या अमुल डेअरी प्रमाणे महाराष्ट्र राज्याचा एकच ब्रँड करून दूध उत्पादक व ग्राहक या दोघांचे हित साध्य करण्यासाठी खासगी दुधाचे ब्रँड बंद करण्यासाठी हे आंदोलन फक्त दूध उत्पादक पुरते मर्यादित न ठेवता ग्राहकांनीही या आंदोलनामध्ये सहभागी झाले पाहिजे तरच दुधात होणारी जनतेची लूट थांबेल असेही महादेव जानकर म्हणाले आहेत तसेच आजच्या आंदोलनात राष्ट्रीय समाज पक्षाचे १९१ तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
आमचा एकही कार्यकर्ता त्यानंतर फोडणार नाही दुधाची नासाडी सुद्धा करणार नाही. आम्ही गरिबांना मोफत वाटणार आहोत आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन करून शेतकऱ्यांनी सुध्दा या आंदोलनाला साथ करावी. असे आवाहन जानकर यांनी केले.

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो.तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय,क्रीडा,आरोग्य,अध्यात्मिक,शेती व उद्योग,व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील.आपले लेख,साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close