ब्रेकिंग

कृषि सहाय्यक सचिन जाधव यांचा उत्कृष्ठ कामगिरीबद्दल गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्र देउन सन्मान

फलटण प्रतिनिधी- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषि संजीवनी सप्ताहाचे आयोजन १जुलै ते ७ जुलै २०२० दरम्यान करण्यात आले होते. फलटण येथील राजाळे, सरडे, साठे, ता फलटण जिल्हा सातारा येथे 1 जुलै ते 7 जुलै 2020 या दरम्यान कृषि सप्ताहाचे यशस्वी व उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल या विभागाचे कृषी सहाय्यक सचिन जाधव यांचा सत्कार गौरव व प्रशस्ती पत्र देऊन जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
   यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी फलटणचे मा. श्री. प्रकाश सूर्यवंशी, तालुका कृषि अधिकारी फलटण मा. श्री. सुहास रणसिंग, तंत्र अधिकारी फिरोज शेख, कृषि अधिकारी एम बी करे, मंडळ कृषि अधिकारी बरड मा. श्री. भरत रणवरे , मंडळ कृषि अधिकारी विडणी मा. श्री. अमोल सपकाळ, मंडळ कृषि अधिकारी तरडगाव मा पूजा दुदुसकर, कृषि पर्यवेक्षक बरड श्री. मल्हारी नाळे, कृषि पर्यवेक्षक विडणी श्री. राजेंद्र पालवे, कृषि पर्यवेक्षक तरडगाव श्री बापू रुपनवर, कृषि पर्यवेक्षक बरड श्री. दत्तात्रय एकळ इ. अधिकारी व कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो.तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय,क्रीडा,आरोग्य,अध्यात्मिक,शेती व उद्योग,व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील.आपले लेख,साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close