ब्रेकिंग

नगरसेवक अजयकुमार माळवे कोव्हिड यौध्दा पुरस्काराने सन्मानित

फलटण( प्रतिनिधी ) फलटण नगरपरिषदेचे विद्दमान नगरसेवक आणि पञकार अजय माळवे यांना फलटण तालुका ग्रामिण पञकार संघाच्या वतीने “कोविङ योद्धा ” पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोविङ योद्धा पुरस्कार मिळण्याची त्यांची हॕट्रीक झाली आहे. कोविङ 19 पादूर्भावाच्या कालावधी मध्ये वार्ङात अन्नछञ , किराणा माल , भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन स्वताः केलेल्या जंतूनाशक फवारणी समुपदेशन कोरोना बाबतची जनजागृती अश्या अनेक केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन फलटण तालुका ग्रामिण पञकार संघाच्या वतीने आज प्रमाणपत्र देऊन आणि यथोचित सत्कार करुन नगरसेवक अजय माळवे यांचा कोविङ योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी पुणे विभागिय संपर्क प्रमुख श्रीरंग पवार , जिल्हाध्यक्ष विनायकराव शिंदे, तालुकाध्यक्ष दिपकराव मदने, उपाध्यक्ष सुभाषराव सोनवलकर, सचिव रोहन झांजुर्णे, अशोकराव सस्ते, चव्हाण उपस्थित होते.फलटण येथील प्रख्यात केबी एक्स्पोर्ट कंपनींच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सत्यमेव जयते ट्रस्ट इंङिया यांच्या वतीने सुद्धा कोविङ योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते .

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो.तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय,क्रीडा,आरोग्य,अध्यात्मिक,शेती व उद्योग,व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील.आपले लेख,साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close