ब्रेकिंग

NRC व CAA विरोधी देशव्यापी आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांच्या सुटकेसाठी फलटण तालुका मुस्लिम जमात संघटनेचे तहसीलदारांना निवेदन


फलटण(प्रतिनिधी)- NRC व CAA विरोधी देशव्यापी आंदोलनात सहभागी आंदोलकांच्या सुटकेची मागणी करण्याकरिता फलटण तालुका मुस्लिम जमात च्या वतीने तहसीलदार याना निवेदन देण्यात आले आहे
डॉ.कफील खान साहेब व विविध ठिकाणच्या आंदोलन कर्त्यांवर ज्या खोट्या केसेस दाखल करून संविधानाने दिलेल्या लोकशाहीला संपविनेच्या दृष्टीने केल्या गेलेल्या केंद्र सरकारच्या मनमानी विरोधात, या सर्व कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी शांतता – सुव्यवस्था – आणि सामाजिक अंतराचे भान ठेऊन या राष्ट्रव्यापी आंदोलनांतर्गत सातारा येथे जिल्हाधिकारी व तालुका स्तरावर तहसीलदार फलटण यांना फलटण तालुका मुस्लिम समाज, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तसेच बहुजन क्रांती मोर्चा या सर्व संघटनेच्या संयुक्त विद्यमाने तहसीलदार आर. सी. पाटील यांना निवेदन देण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

    हे आंदोलन राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील 550 जिल्ह्यातील व 4500 तालुक्यात केले जात आहे. यावेळी बादशाही मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष सलीमभाई शेख, हाजी निजाजभाई आतार ,अमीर शेख ,पप्पू शेख, मेहबूबभाई मेटकरी, रियाजभाई इनामदार, हाजी सदिकभाई बागवान, रहिम तांबोळी, जमशेद पठाण, आबिद खान, रियाज बागवान, सैफुल्ला शेख सिकंदर डांगे,  मुनिर तांबोळी अजीज शेख, जावेद शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो.तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय,क्रीडा,आरोग्य,अध्यात्मिक,शेती व उद्योग,व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील.आपले लेख,साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close