ब्रेकिंग

माजी मंत्री महादेव जानकर लॉकडाऊनच्या काळात करताय शेतात तण काढण्याचे व औत धरण्याचे काम

ध्यान-धारणा व योगा साधना करणे व वाल्मीकी रामायण यासारख्या पुस्तकांचे वाचन करीत दिनक्रम घालवित आहे.- माजी मंत्री जानकर

बीड प्रतिनिधी- कोरोना या संसर्गजन्य आजारांचा प्रसार व वाढत चाललेला असला तरी राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडत असताना राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर मात्र आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी 35 दिवस मुक्कामाला असून या कालावधीत कार्यकर्त्याच्या शेतामध्ये राबताना दिसून येत आहेत. ते कार्यकर्त्यांच्या शेतामध्ये दररोज बैलगाडी मध्ये बसून जातात तेथे शेतामध्ये तण काढतात त्याचबरोबर ते औत धरण्याचे काम करीत आहेत.

माजी मंत्री महादेव जानकर वाल्मिकी रामायण पुस्तकाचे वाचन करताना.

     पाच वर्ष युतीच्या राज्यात कॅबिनेट मंत्रीपद उपभोगल्यानंतर पुन्हा सत्तेच्या आसपास राहण्याचा अनेक नेते प्रयत्न करीत असतात. मात्र, माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर त्याला अपवाद आहेत. 

अनेक नेते मंडळी सत्तेच्या आसपास राहण्यासाठी सतत सेटिंग लावण्याच्या प्रयत्नात असतात मात्र महादेव जानकर याला अपवाद ठरले आहेत.
सामान्य शेतकऱ्याप्रमाणे शेतात तण काढण्यापासून ते औत धरण्यापर्यंतची सर्व कामे जानकर करत आहेत. त्याचबरोबर ध्यानधारणा, योग साधना व वाल्मिकी रामायण यासारखी पुस्तके वाचण्यात मध्ये आपला लॉकडाऊन मधील कालावधी घालवत आहेत. महादेव जानकर सध्या गेल्या महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गुंठेगाव येथे आले आहेत. त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे यांच्याकडे ते उतरले आहेत. मात्र कार्यकर्त्याच्या घरी आल्याने ते स्वस्थ बसलेले नाहीत.

माजी मंत्री जानकर शेतातील तण काढताना

          लॉकडाऊनमुळे गुंठेगावात अडकून पडावं लागल्याने जानकर हे सध्या वाघमोडे यांच्या शेतात राबत आहेत. वाघमोडे यांच्या शेतात ते पहाटेच जातात. औत ओढण्यापासून ते शेतातील तण काढण्यापर्यंतची कामं ते करत आहेत. या शिवाय सीताफळाची लागवड असो की घरात पाणी भरणे असो कोणताही अविर्भाव न ठेवता ते ही कामं करत आहेत. दिवसभर शेतात राबल्यानंतर जानकर हे वाघमोडे कुटुंबासोबत जमिनीवर बसूनच जेवण करतात. गावातून शेतात जाण्यासाठी बैलगाडीचाच वापर करतात. गावातील टपरीवर स्वत: चहा बनवून स्वत:ही पितात आणि इतरांनाही देतात, असं वाघमोडे यांनी सांगितलं. गेल्या ३६ दिवसांपासून ते आमच्या शेतात राबत आहेत. आम्ही त्यांना काम करण्यास मनाई करतो. पण मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे, असं सांगत ते शेतात काम करतात. त्यामुळे आम्हाला त्यांना अडवता येत नाही, असे हि परमेश्वर वाघमोडे यांनी सांगितलं.

          एकदा जानकर नववीत शिकणाऱ्या रितेश अशोक वाघमोडे सोबत रानात गेले होते. रितेशला घरी गवत न्यायचे होते, त्यामुळे त्याने गवत कापायला सुरुवात केली. ते पाहून जानकर यांनीही मीही तुला मदत करतो असं म्हणत गवत कापलं. थोडथोडकं नव्हे तर अर्धी गाडी गवत कापलं. भाजपमध्येच काय, देशाच्या राजकारणातही असं पहिल्यांदाच घडलंय!

असा आहे दिनक्रम जानकर यांचा


जानकर यांचा दिवस पहाटे ५ वाजता सुरू होतो. सकाळी व्यायाम केल्यावर अध्यात्मिक ग्रंथांचं वाचन करतात. त्यानंतर शेतात काम करतात. टीव्ही बघत नाहीत, असं सांगतानाच एवढ्या दिवसात एकदाच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलो होतो, असं जानकर यांनी सांगितलं.

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो.तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय,क्रीडा,आरोग्य,अध्यात्मिक,शेती व उद्योग,व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील.आपले लेख,साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close