ब्रेकिंग

खुंटे माध्यमिक विद्यालयाचा निकाल शेकडा १०० टक्के

साक्षी खलाटे हिला ९३.४० टक्के गुण

फलटण प्रतिनिधी- जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचलित खुंटे माध्यमिक विद्यालय खुंटे या विद्यालयाचा एस. एस. सी. बोर्ड दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या विद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी कृष्णात खलाटे हिला ९३.४० टक्के गुण मिळवून ती विद्यालयांमध्ये प्रथम आली आहे. तर प्रियांका प्रमोद खलाटे हिला ९३.२० टक्के गुण मिळाले असून ती द्वितीय आली आहे. तर सोनल गणेश भिसे हा विद्यार्थीनीला ९०.४० टक्के गुण मिळवून विद्यालयांमध्ये तृतीय क्रमांकाने यशस्वी झाला आहे.

                            यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. मुळीक मॅडम श्री भिसे सर, श्री. वाघमारे सर, श्री. नाळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे सचिव शारदादेवी सूर्याजीराव कदम तसेच संस्थेचे अध्यक्ष सह्याद्री चिमणराव कदम, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अच्युतराव खलाटे खुंटे गावचे सरपंच, उपसरपंच व परिसरातील ग्रामस्थ या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो.तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय,क्रीडा,आरोग्य,अध्यात्मिक,शेती व उद्योग,व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील.आपले लेख,साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close