ब्रेकिंग

महात्मा शिक्षण संस्था संचलित मुकबधिर विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

ज्यांना बोलता व ऐकताही येत नाही अशा मूकबधिर विद्यालयाचा सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल

फलटण प्रतिनिधी – महात्मा शिक्षण संस्था फलटण संचलित मूक बधिर विद्यालय ठाकूरकि गोळेगाव येथील मूकबधिर विद्यालयाचा दहावीचा निकाल हा सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के लागला आहे. ज्यांना ऐकताही येत नाही. व बोलताही येत नाही. अशा विद्यार्थ्यांना शिकवणे खूप जिकिरीचे असते तरीदेखील अशा मूकबधिर मुलांना शिक्षण देण्याचे पवित्र कार्य महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेली कित्येक वर्षे चालू आहे.

          अशातच अपंग मुलांना शिकवून त्यांचे शैक्षणिक त्याचबरोबर व्यवसायिक पुनर्वसन व्हावे म्हणून गेल्या पाच वर्षापासून महात्मा शिक्षण संस्थेच्या मध्यमातून एक उपक्रम हाती घेतला आहे. तो म्हणजे असा की, इयत्ता दहावीच्या वर्ग चालविण्यास संस्थेला मान्यता नाही. तरी देखील या संस्थेने स्वताच्या पातळीवर दोन शिक्षकांची नेमणूक करून इयत्ता दहावीचा वर्ग चालू केला आहे. व सलग दोन वर्षे या मुलांना दहावीचे विषय शिकविले जातात व ही मुले नंतर १७ नंबरचा फॉर्म भरून इयत्ता १० वीला बसवली जातात.
सलग दुसऱ्या वर्षी महात्मा शिक्षण संस्थेच्या मूकबधिर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून कु. सायली अंकुश राऊत या विद्यार्थिनीस शेकडा ७०.४९ टक्के गुण मिळवून ती मूकबधिर विद्यालय विद्यार्थ्यांमध्ये पहिली आली आहे तर कु. सृष्टी दीपक तेली या विद्यार्थिनीला ६९.६० एवढे गुण मिळवून ती विद्यालय मध्ये द्वितीय आली आहे. व कुमार सचिन ज्ञानेश्वर गावडे या विद्यार्थ्यास ६९.२० मिळाले आहेत. व तो मूकबधिर विद्यालयात तृतीय आला आहे.
या विद्यार्थ्यांना हेमा गायकवाड मॅडम, वैशाली शिंदे, सौ. मठपती तसेच मुख्याध्यापक दीप्ती देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
महात्मा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनोद हाके कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले सचिव सौ. वैशाली चोरमले, हर्षकुमार निकम, सुनील चव्हाण, राजू भोईटे, विजयकुमार लोंढे पाटील, राजेंद्र रणसिंग, धनाजी जाधव, प्राचार्य विष्णू कुंभार सर, जयकुमार कोठाडिया इत्यादी मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो.तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय,क्रीडा,आरोग्य,अध्यात्मिक,शेती व उद्योग,व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील.आपले लेख,साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close