क्राईम

जर आपल्या पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर SBI च्या ‘या’ सल्ल्याचा करा विचार, नाहीतर होईल ‘हे’ नुकसान

फलटण प्रतिनिधी- भारत देशामध्ये सर्वात मोठी व विश्वासहर्ता असलेली बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे सर्वात पहिले नाव घेतले जाते. म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ४२ कोटी खातेदारांना सावध केले आहे.  कोरोना या संसर्गजन्य महामारी च्या पार्श्वभूमीवर व लॉकडाऊन मुळे लोक सध्या बाहेर पडत नसून ते सध्याच्या काळात ऑनलाइन पैशाचे ट्रांझेंक्शन करीत आहेत.

                   त्यामुळे डिजिटल ट्रांझॅक्शन वाढीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याचे एसबीआयचे म्हणणे आहे. लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता एसबीआयने आपल्या ग्राहकांना सावध करताना ऑनलाइन ट्रांझॅक्शन करण्यासाठी काही सेफ्टी टिप्स दिलेल्या आहेत. जर आपल्याकडे देखील देशातील या सर्वात मोठ्या बँकेचे खाते असेल तर आपण या टिप्सना फॉलो करून आपले पैसे सुरक्षित ठेवू शकता.

                       एसबीआयने ट्विटरवर एक ट्वीट शेअर करुन लोकांना ऑनलाइन बँकिंग करताना सावध रहायला सांगितले आहे. एसबीआयने ट्विट केलेल्या या व्हिडिओमध्ये फायनान्सशियल सर्विसेज सेक्टर हे नेहमीच सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य असते. जर आपल्यालाही असे फ्रॉड कॉल, ईमेल किंवा टेक्स्ट मेसेजेस येत असेल, ज्यात आपल्याला पर्सनल डिटेल्स शेअर करण्यास सांगितले गेले किंवा त्वरित पैशाची मागणी केली गेली. जर आपल्या बँक खात्यातून असे कोणतेही ट्रांझॅक्शन झाले असेल जे आपण केलेले नाहीत तसेच जर आपण आपली पर्सनल इंफॉर्मेशन किंवा अकाउंटची स्पेसिफिक माहिती कोणाबरोबर तरी शेअर केली असेल तर आपणही एखाद्या सायबर गुन्हेगाराला बळी पडला असाल तर कृपया स्थानिक पोलिसांना किंवा सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल https://cybercrime.gov.in/ वर कळवा. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. या प्रकरणाचा रिपोर्ट करा. जेणेकरुन हे जग सर्वांसाठी एक सुरक्षित स्थान बनू शकेल.

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो. तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, अध्यात्मिक, शेती व उद्योग, व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील. आपले लेख, साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946 8605376793

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close