आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

कोरोना कामकाजातून शिक्षकांना कार्यमुक्त करा अन्यथा कामकाजावर बहिष्कार घालणार – शिक्षक नेते जितेंद्र पवार

शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

सोलापूर प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्यसह प.म महाराष्ट्रातील जवळपास हजारो शिक्षकांना गेली दिड ते दोन महिन्यांपासुन कोविड -19 च्या संदर्भात कामकाज दिले आहे. व ते शिक्षकांनीही आनंदाने स्वीकारले होते. पंढरपूर, अक्कलकोट तसेच अनेक तालुक्यांमध्ये सदर काम करणाऱ्या शिक्षकांना 14 दिवसानंतर कार्यमुक्त करण्यात आले आहे. तर ज्या शिक्षकांचे ५५ वर्षाच्या पुढे वय असेल अशा शिक्षकांना या कामातून वगळण्यात आले आहे. 

परंतु सोलापूर शहरातील शिक्षकांना मात्र अजूनही कार्यमुक्तीचे आदेश दिले नसून ते आजही कार्यमुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. दि.24/06/2020 च्या शासन निर्णयामध्ये शिक्षकांना कार्यमुक्त करावे असे स्पष्ट आदेश असूनही शिक्षकांना कार्यमुक्त केले जात नाही. शिक्षकांच्या सहनशीलतेचा अंत होत असल्याने बुधवार पर्यंत कार्यमुक्तीचे आदेश न आल्यास गुरुवारपासुन सर्व शिक्षक या कामावर बहिष्कार घालणार असल्याचे प्रतिपादन पुणे विभागीय शिक्षक परिषदेचे कार्याध्याक्ष जितेंद्र पवार यांनी केले आहे. व तशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने आज जिल्हाधिकारी व म.न.पा. आयुक्त यांच्याकडे देण्यात आले आहे.
            यावेळी पुढे बोलताना जितेंद्र पवार म्हणाले की, सदरच्या शिक्षकांना दोन दिवसात कार्यमुक्तीचे आदेश दिले नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन आम्हाला शिक्षक परिषदेच्या माध्यमातून उभे करावे लागेल व या आंदोलनास सर्वस्वी जबाबदार प्रशासकीय अधिकारी राहतील याची नोंद शासनाने घ्यावी असेही शेवटी जितेंद्र पवार म्हणाले.
या प्रसंगी मा.श्री.रणजीत सावंत सर, श्री. उमेश कल्याणी सर यांनी शिक्षकांना होणारा शारीरिक व मानसिक त्रास व शिक्षकांच्या व्यथा आपल्या भाषणात मांडल्या.
यावेळी श्री. नागनाथ फताटे, मनोज टंकसाळ, एन पवार, नितीन भोसले सर, प्रकाश गुजेटी, अजय वाघमारे, अतुल गोंडाळ सर, सुग्रीव गायकवाड सर, भगवंत देवकरसर, निलेश वाघोले सर, विश्वनाथ कंदीसर इत्यादी शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो. तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, अध्यात्मिक, शेती व उद्योग, व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील. आपले लेख, साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946 8605376793

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close