आरोग्य व शिक्षण

वक्ता दशसहस्रेशु* !! *अहो असा वक्ता हजारो कोटीत मिळणार नाही.

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या पुण्यस्मरणानिमित्त

फलटण प्रतिनिधी आपल्या ओघवत्या, रसाळ वक्तृत्वशैलीने मराठी माणसांची मने केवळ रिझविणारेच नव्हे तर त्यांच्यावर मूल्यसंस्कार घडविणारे, शब्दांच्या लयदार, आशयघन फेकीने हजारोंना खिळवून ठेवत अक्षरश: मंत्रशक्तीचाच प्रत्यय आणून देणारे
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे आज पुण्यस्मरण* (जुलै १५, १९२७ – जून २९, २०१०)त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कलेढोण येथे झाला. माजी मुख्य मंत्री बाबासाहेब भोसले हे त्यांचे बंधू

कर्मवीर भाऊराव पाटील फलटण फलटण येथील मुधोजी हायस्कूलच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सातारच्या रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाची फांदी तुमच्यासाठी आणली आहे. असे श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांना त्यांनी   सांगितले  ही फांदी म्हणजेच प्राचार्य शिवाजीराव भोसले. 
ते १९५७ पासून फलटण येथील मुधोजी कॉलेजमध्ये रुजू झाले. तिथून पुढे सलग २५ वर्षे शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले. ३ मध्ये शिवाजीराव मुधोजी कॉलेजचे प्राचार्य झाले. त्यानंतर १९८८ ते १९९१ दरम्यान त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपदाचे काम पाहिले.
योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, मराठी संत, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय समाजसुधारक, पुणे, भारतीय तत्वज्ञ, तर्कशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य या विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्यान देणे, ही त्यांची हातोटी होती. त्यांनी पुणे आकाशवाणी, वसंत व्याख्यानमाला, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व्याख्यानमाला, विवेकानंद शिला स्मारक समिती व्ख्यानमाला यांच्यासह देशाविदेशात विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली. त्यांनी लिहिलेली दीपस्तंभ, यक्षप्रश्न, जागर (खंड १ आणि २), प्रेरणा, हितगोष्टी ही पुस्तकं प्रचंड गाजली आहे.”
रहिमतपूर येथील सौ चित्रलेखा माने यांनी त्यांची पुस्तक तुला करून यथोचित सन्मान केला होता

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो. तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, अध्यात्मिक, शेती व उद्योग, व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील. आपले लेख, साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946 8605376793

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close