ब्रेकिंग

साखरवाडी विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

फलटण प्रतिनिधी- नुकताच शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे या शिष्यवृत्ती परीक्षेत साखरवाडी विद्यालयातील विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन करून जिल्ह्यात यशाचा झेंडा फडकावला. इयत्ता पाचवी परीक्षेत सतरा बसून आठ उत्तीर्ण झाले व तीन पात्र ठरले १.प्रथम दोशी 2.वैष्णवी साबळे 3.आर्या बोंद्रे हे शिष्यवृत्तीस पात्र ठरले.

या विद्यार्थ्यांना सौ.गाडेकर, सौ. रेवडीकर, सौ.तावरे व श्री.ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेस १२ प्रविष्ट ६ शिष्यवृत्तीस पात्र ठरले. 1. तनुश्री साळुंखे 2. रेणुका भोसले 3. जान्हवी सरगर 4. हर्षदा लांडगे 5. प्रणीता शिंदे, 6.आदित्य भोसले पात्र ठरले.
या विद्यार्थ्यांना म.बा. लांंडगे, सौ.पिंगळे, सौ.भोसले, सौ.थोरात , सौ.जगताप, श्री.फडतरे यांनी मार्गदर्शन केले.
या सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रल्हादराव साळुंखे- पाटील, श्री.धनंजय साळुंखे- पाटील, श्री.राजेंद्र शेवाळे, श्री.राजेंद्र भोसले, कौशल भोसले व सचिव सौ.उर्मिला जगदाळे यांनी केले.

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो. तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, अध्यात्मिक, शेती व उद्योग, व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील. आपले लेख, साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946 8605376793

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close