ब्रेकिंग

मा.श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत विश्वजितराजे यांच्या शुभहस्ते वडजल येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन संपन्न

फलटण प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर व आमदार दिपकराव चव्हाण यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे खेचून आणण्यात आपण यशस्वी झालो असून या निधीच्या माध्यमातून आज वडजल ता. तालुका फलटण येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा करण्यास आपणाला एक आगळा वेगळा आनंद वाटत असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांनी केले.

यावेळी फलटण तालुक्याचे लोकप्रिय युवा नेते तथा फलटण पंचायत समितीचे सभापती  श्रीमंत विश्वजीतराजे ना. निंबाळकर, युवानेते रणजितसिंह भोसले, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव मानेनंदकुमार नाळे, प्रतापसिंह निंबाळकर, माजी सरपंच रामभाऊ घोडके, सरपंच सौ. संगीताताई ढेंबरे, श्रीकांत सुळ, ढवळेवाडीच्या सरपंच सौ कदम ताई ,सरपंच योगेश ढेंबरे ,सौ स्वाती पिसाळ ,रेश्मा ताई ढेंबरे ,श्री विकास पिसाळ, शाखा अभियंता अशोक काळे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुढे श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, फलटण तालुक्यांमध्ये विकास कामे करीत असताना कधीही निंभोरे, ढवळेवाडी या गावाला निधीची कमतरता भासू देणार नसून भविष्यात गावातील सर्वांनी एकजुटीने राजेगटाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचेही शेवटी श्रीमंत संजीवराजे म्हणाले.

यावेळी तुकाराम पिसाळ, वडजल चे माजी सरपंच वालचंद पिसाळ, चंद्रकांत पिसाळ, काशिनाथ ढेंबरे, मल्हारी ढेंबरे, तानाजीराव ढेंबरे, बिरदेव पिसाळ, शंकर देवकर, बिरदेव पिसाळ, निरंजन पिसाळ, संजय देवरे, नाथा तांबे, ग्रामसेवक हिम्मतराव गायकवाड इत्यादी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो. तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, अध्यात्मिक, शेती व उद्योग, व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील. आपले लेख, साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946 8605376793

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close