ब्रेकिंग

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त कु.ज्ञानदा सचिन कदम हिने २१ वी. गडकिल्ले मोहिम यशस्वीपणे सर केली

फलटण प्रतिनिधी- आज दिनांक ९ जानेवारीला २०२२ रोजी कु. ज्ञानदा सचिन कदमने वय वर्ष – ६ हिने २१- वी गड किल्ले अभ्यास मोहीम श्री राजमाता जिजाऊ जयंती (12/01) तसेच राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून, अपरिचित अतिप्राचीन पुणे शहरापासून अगदी जवळ असणारा किल्ले घनगड पूर्ण केली आहे.

लोणावळ्यापासून भांबुर्डे व नंतर एकोले गाव लागतं. या गावी घनगड किल्ला हा अगदी मध्यभागी आहे. चढायला सोपा पण जंगल ट्रेक करावा लागणारा देखना असा घनगड. या गडाचे प्रथम प्रवेशद्वार आजही अस्तित्व टिकून आहे. शिवलिंग, वाघजाई चे मंदिर, पाण्याचे टाके, पायऱ्या ने जाणारी वाट, एक कातळकडा लोखंडी शिडीने चढाई करावा लागतो.

हे या गडाचे वैशिष्ट्य आहे. ज्ञानदा ला तिच्या अभ्यासू वृत्तीतून जाणवलेली एक गोष्ट सदर दरवाज्याची (दरवाजा नं.- २) दुरुस्ती व्हावी. गडाच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर पश्चिम कड्यावरून खाली पाहिले असता दाट धुक्यामध्ये आपल्या पडणाऱ्या सावलीच्या भोवती हात फिरवाल्यावर यामध्ये विलोभनीय इंद्र वलय तयार होते. किल्ल्यावरून सुधागड अप्रतिम दिसतो तसेच दरीच्या पलीकडे तैलबैला सुद्धा खूप छान दिसतो. कु‌. ज्ञानदाने किल्ले घनगड मोहीम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना समर्पित केली.

राजमाता जिजाऊनीं शस्त्र – शास्त्र शिकून रयतेचे राज्य निर्माण करणारे राजे शिवाजी महाराज व राजे संभाजी महाराज या देशाला दिले. कु. ज्ञानादाने जगातील तमाम मुलींना हा संदेश दिला आहे की, शस्त्र आणि शास्त्र हाती घ्या. शस्त्र आणि शास्त्र हाती घेतले तर कोणासमोरही आम्हाला म्हणून झुकावे लागणार नाही.

पुढे कु.ज्ञानदा म्हणते शास्त्र समजून घ्यायचे असेल तर संस्कृत ही भाषा आलीच पाहिजे म्हणून ती आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडे मागणी करते की, इयत्ता पहिली पासून संस्कृत हा विषय सर्व शाळांमधून शिकवला जावा. ती स्वतः संस्कृत भारतीच्या माध्यमातून संस्कृत शिकत आहे.

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो. तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, अध्यात्मिक, शेती व उद्योग, व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील. आपले लेख, साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946 8605376793

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close