ब्रेकिंग

कोरोना ओमायक्रॉनला प्रतिबंध घालण्यासाठी मास्क घाला प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा- मा.ना.श्रीमंत रामराजे

आधुनिक नाना पान शाॅपीचे उद्दघाटन समारंभ संपन्न

फलटण प्रतिनिधी- फलटण मध्ये गेल्या चार दिवसांत रूग्णसंख्येची वाढ होत आहे. आता प्रशासनाने कडक निर्बंध घातले असून आपणासह सर्वांनी मास्क घालून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा.ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.फलटणमधील गजानन चौक येथील आधुनिक नाना पान शॉपीच्या उद्घाटन प्रसंगी श्रीमंत रामराजे बोलत होते.

यावेळी महानंद दुध मुबईचे व्हा. चेअरमन डि. के. पवार, फलटण तालुका दुध पुरवठा संघाचे माजी चेअरमन प्रा. भिमदेव बुरुंगले, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे

माजी नगरसेविका सौ. प्रगती जगन्नाथ कापसे, भाऊसाहेब कापसे, दादासाहेब चोरमले, माजी नगरसेवक किशोरसिंह ना.निंबाळकर, राहुल निंबाळकर, अमरसिंह खानविलकर इ. मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुढे श्रीमंत रामराजे म्हणाले की, नाना पान शॉपी हि पूर्णता पुणे,मुंबई या शहराच्या धर्तीवर आधुनिक पद्धतीने तयार केली असून या पान शॉपीमध्ये सर्व प्रकारच्या फ्लेव्हरची पाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत असे सांगून ते म्हणाले मागील वर्षांमध्ये कोरानाची पहिली, दुसरी लाट येऊन गेली यामध्ये प्रामुख्याने दुसऱ्या लाटेचा फटका नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. आता  संभाव्य कोरोनाची तिसरी लाट येऊ पाहत असताना या लाटेचा मुकाबला करण्यासाठी फलटण तालुक्यातील प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली असून तशा स्वरुपाच्या सक्त सूचना आपण प्रशासनास दिल्या आहेत त्यामुळे १ हजार रुग्ण एका वेळी आपण मॅनेज करु शकतो अशी व्यवस्था केली आहे. तरीपण प्रतिबंध म्हणून आपण सर्वांनीच मास्क घातले पाहिजे त्याचबरोबर योग्य ती काळजी घेतली तर कोरोनाचा प्रतिबंध नक्की होऊ शकतो असेही शेवटी श्रीमंत रामराजे म्हणाले.

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो. तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, अध्यात्मिक, शेती व उद्योग, व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील. आपले लेख, साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946 8605376793

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close